औरंगाबाद : एम.पी.एस.सि परीक्षेची तयारी करण्यासाठी वाकोला येथून औरंगाबादेत आलेल्या 21 वर्षीय तरुणाने पैठणगेट परिसरातील कांनफाटे हनुमान मंदिर जवळील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली.
आकाश विजय बोढरे वय-21,(रा.वाकोला, ह.मु. पैठणगेट परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण विद्यार्थांचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आकाश हा मागील वर्षभरा पासून शहरात आला होता.तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.दोन मित्रासह तो पैठणगेट भागातील किरायच्या खोलीत राहत होता. मंगळवारी दोन्ही मित्र बाहेर गेलेले असताना त्याने दोरीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.दोन्ही मित्र परत खोलीत आल्यावर हा प्रकार समोर आला.आकाश ने उमेदीच्या वयात आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल का उचलला हे स्पष्ट होऊ शकले नाही.या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस हवलंदार दत्तात्रय वानखेडे हे करीत आहेत.